चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले. मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत.
त्यानंतर गावंडे कुटूंबियांच्या स्वाधीन केले जाणार आहे. आज शनिवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे (रा. साटगाव कोलारी (ता.चिमूर)अशी मृतांची नावे आहेत. गावंडे कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती सगळीकडे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या परिसरातील ढिवर बांधवांच्या मदतीने मृतदेहांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. अवघ्या तासभरात खोल खड्यात एकाच ठिकाणी पाचही मुलांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह ग्रामीण रूग्णालय नागगभीड येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे.
English Translate:
Chandrapur:- Five children who had gone for tourism to the Ghodazari project in Nagbhid taluka of the district drowned in a lake. The bodies of all five children were found by the Nagbhid police after an hour. The bodies have been taken into custody and sent to Nagbhid Rural Hospital for autopsy.
After that, the bodies will be handed over to the Gawande family. The incident took place today, Saturday (15) at around 4 pm. The names of the deceased are Janak Kishore Gawande, Yash Kishore Gawande, Aniket Yashwant Gawande, Tejas Balaji Gawande and Tejas Sanjay Thackeray (Res. Satgaon Kolari (Tal. Chimur). The Gawande family is in mourning.
As soon as the information about this incident spread, citizens crowded the spot. Nagbhid police reached the spot and conducted a preliminary investigation. After that, a search operation was launched for the bodies with the help of the Dhiwar brothers of the area. In just an hour, the bodies of all five children were found in the same place in a deep pit. The bodies were taken out and taken into custody by the police. The bodies have been sent to the rural hospital Naggbhid for autopsy. The police are conducting further investigation.