वडसा : 46 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

wadsa,Wadsa news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Suicide,Wadsa Today,Wadsa Crime,Desaiganj,Desaiganj News,

wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Suicide,Wadsa Today,Wadsa Crime,Desaiganj,Desaiganj News,

वडसा (गडचिरोली): 
वडसा शहराच्या गांधी वार्ड येथे एका 46 वर्षीय इसमाने स्वतःच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार 15 डिसेंबरच्या दुपारी 2  वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव उमेश महादेव सिंगाडे (वय 46 वर्षे) रा.गांधीवार्ड वडसा ,ता.वडसा अस आहे. (Wadsa Suicide)

मिळाळलेल्या प्राप्त माहितीनुसार, उमेश सिंगाडे यांचे वडसा शहराच्या ब्रम्हपुरी मार्गावर गांधी वार्ड या ठिकाणी आशापुरा फर्निचर मार्टचे दुकान आहे. सिंगाडे हे रविवारला दुकान बंद ठेवून कारागिरांची साप्ताहिक मजुरी अदा करीत असतात.त्यानुसार आज रविवारी उमेश सिंगाडे हे कारागिरांची साप्ताहिक मजुरी अदा करण्यासाठी दुकानात गेले व मजुरांची मजुरी अदा केली. 

मात्र,बराच वेळ होऊनही उमेश सिंगाडे हे घरी न परतल्याने त्यांच्या आई दुकानाकडे गेल्या.दुकानाचे दार उघडे असल्याने त्यांनी आवाज दिला,आवाज देत  आतमध्ये गेल्या असता उमेश सिंगाडे हे नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दुकानात दिसून आले. त्यातच त्यांनी ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. उमेश सिंगाडे यांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला त्या ठिकाणी जवळच सिडी दिसून येत आहे; मात्र,त्यांनी गळफास लावून आत्महत्या कां केली हे अद्याप कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.