गडचिरोली:- गोसीखुर्द धरणाच्या विद्युत गृहामधून 80 क्यूमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने चीचडोह बॅरेजचे पाणी साठ्यात वाढ होऊन नदीची पाणी पातळी वाढत आहे. तसेच या प्रकल्पाचे ऊर्ध्व भागातील तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे नदी पात्रातील बांधकाम करावायचे असल्याने पाणी पातळी कमी करण्याबाबत संबंधित विभागाने विनंती केलेली आहे.
प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी (FRL) 183.63 मी. असून आजची पाणी पातळी 179.900 मी. व जिवंत पाणीसाठा 18.54 द.ल.घ.मी.आहे. गोसीखुर्द धरणातून येणाऱ्या येव्यामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्याने दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे 1 द्वार व 4 रिव्हर स्ल्युइस मधून 299 क्युमेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आले आहे. तरी नदी काठी असलेल्या सर्व नागरिकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.