जळगाव:-विवाहितेने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना जळगावातील आव्हाणे शिवारात घडली. राणी श्यामकांत देशमुख (वय ४४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणी देशमुख कुटुंबासह ओमसाईनगरात वास्तव्यास होती. देशमुख हे मुळ अडावद येथील रहिवासी आहेत. ते येथे एका कंपनीत कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे राणी यांचे पती दि. ३० जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले. दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद करून दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना समोर आली. तत्काळ त्यांनी खबर तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली.
दरम्यान विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.