- माणुसकीला काळिमा फासणारी घटना
- आरमोरी येथील शिवम रेस्टॉरंट मधील प्रकार
- आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- मारहाणीचा प्रकार कॅमेरात बंदिस्त
आरमोरी: आरमोरी-येथील वडसा टी. पॉईंट जवळ पोस्ट ऑफिस कार्यालायनजीक लागून असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय बंगाली तरुणीस मुस्लिम युवकांनी विनाकारण स्वातंत्रदिनी बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.हा सर्व प्रकार कॅमेरात बंदिस्त झाला असून त्या तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला असून आरोपी फरार झाले आहेत.मात्र या प्रकरणातील खरी सूत्रधार आरोपीची पत्नी असून तिच्यावर मात्र गुन्हा नोंद करण्यात आली नाही.
आरोपीचे नाव सोहेल शेख रा.बर्डी आरमोरी वय वर्षे ३० व अयुब रा.कासार मोहल्ला आरमोरी वय वर्षे३८ असे फरार झालेल्या आरोपींचे नाव आहे.
घटनेचा विडिओ :
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी येथील वडसा पॉईंट जवळ शिवम रेस्टॉरंट असून मागील ०९ महिन्यापासून १९ वर्षीय बंगाली युवती काम करीत आहे.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजताच्या दरम्यान आरोपी सोहेल व त्याची पत्नी सदर रेस्टॉरंट मध्ये दोसा खाण्यासाठी आले.परंतु आरोपी सोहेल याने पत्नीला रेस्टॉरंट मध्ये सोडून तो बाहेर कामासाठी निघून गेल्यानंतर सोहेलच्या पत्नीने सदर युवतीस मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर मागितला. परंतु सदर युवतीने तिला सांगितले की,मालकाचा आदेश असल्याने मी तुम्हाला चार्जर देऊ शकत नाही.यानंतर सोहेलच्या पत्नीने तिच्याशी बाचाबाची केली.व मी तुला पाहून टाकीन,तू रेस्टॉरंट मध्ये कशी राहतेस मी तुला पाहून टाकीन,अशी धमकी दिली. व आरोपी साहिलच्या पत्नीने आपल्या पतीस फोन करून झालेल्या घटनेची उलट माहिती दिली.त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात आरोपी सोहेल हा रेस्टॉरंट मध्ये पोहोचला. व काउंटर मध्ये बसलेल्या युवतीचे केस धरून काउंटर मधून बाहेर खिचले.व रेस्टॉरंट मध्ये असलेल्या टेबल वर तिचे जोरजोराने डोके आपटले.यानंतर आरोपी सोहेलने एवढ्यावरच न राहता तिचे केस धरून फरफटत नेले. व तिच्या छातीवरील कपडे पकडून तिला खाली पाडले. व तिला लाता बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी वारंवार हॉटेल मालकाने त्यांना अटकाव केला परंतु त्याला न जुमानता आरोपी सोहेल मात्र तिला लाता बुक्क्यांनी मारतच होता. यानंतर सदर युवती ही बेशुद्ध पडली.यानंतर आरोपी सोहेलने फोन करून आपल्या समाजातील १० ते १५ लोकांना बोलावून घेतले.यांपैकी आरोपी अयुब पठाण हा सदर युवतीजवळ येऊन त्याने सुद्धा तिला मारहाण केली.आरोपी सोहेलने तिला अश्लील शिवीगाळ करून तुला नदीकाठी वेषेचा कोठा लावून देतो,हिला धरा व घेऊन चला असे आपल्या सोबत्यांना सांगितले. परंतु हॉटेल मालकाने तिला आणखी मारू नये म्हणून समयसूचकता दर्शवून तिला मागील खोलीत नेऊन बंदिस्त केले.यानंतर सोहेलच्या मित्रांनी धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला.यानंतर सोहेलने स्वतःच पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन सदर युवतीस ताब्यात घेतले.मात्र सी सी टी व्ही वरून आरोपी सोहेल व त्याचा साथीदार असल्याने पोलीस या दोघांचा शोध घेत आहे.सदर तरुणीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी विनयभंग, लज्जास्पद वर्तणूक,अश्लिल शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी,यावरून कलम ७४,७९,११५(२),३५१,३(५) अनवै गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास आरमोरी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहे.
सदर प्रकरणाचा भारतीय जनता पार्टी आरमोरी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदिनी निषेध नोंदविला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.