चंद्रपूर : गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 28 गेट 1.5 मीटरणे तर 5 गेट 2 मीटरणे उघडण्यात आले असून जवळसपास 3 लाख 83 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरू आहे. संजय सरोवर जलाशय (भीमगड) धरणाच्या पाणीसाठा क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक होत आहे, त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी संजय सरोवर जलाशय मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.
भंडारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूय. बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बपेरा पुलावर चार फूट पाणी असुन महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटलाय. कारधा छोट्या पुलावरही पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे. गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने जवळसपास 3 लाख 83 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल.
भंडारा शहराला धोका निर्माण होऊ नये म्हणून जिला प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा कोलारी, बेलगाव ,देऊळगाव, धानोरी, दिघोरी ,नांदगाव जानी ,भालेश्वर ,पिंपळगाव भोसले ,अऱ्हेर नवरगाव ,चिखलगाव ,लाडज ,हरदोली ,सावलगाव ,सोनेगाव, बेटाळा, बोळेगाव, खरकाळा ,रणमोचन ,पिंपळगाव खळखळा, रुई ,निलेश, पाचगाव ,गांगलवाडी, बरडकिणी ,चितेगाव, वांदरा ,डोरली ,आवळगाव ,हळदा, मुलगा मांगली ,किन्ही ,या गावातील जनतेला सूचित करण्यात येते की गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे खुले असून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव.
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.