भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 30 गेट अर्ध्या मीटरणे तर उर्वरित 3 गेट 1 मीटरणे उघडण्यात आले असून 3987.75 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडाची 5 गेट 0.75 मिटरने उघडण्यात आली असून 363.15 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 3987.75 क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.