गडचिरोली :- जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर संततधार पाऊसधारा कोसळल्याने काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आवागमन करणारी मार्ग बंद झाली आहेत.
- आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
- अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी
- कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा
- आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी
- जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
- पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा
- वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा
- कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा
- कारवाफा पोटेगाव रस्ता
- मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता. कुरखेडा
- गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा
- वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज
- लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला
- आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता.भामरागड, अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता.अहेरी, कुरखेडा- तळेगाव-चारभट्टी रस्ता ता.कुरखेडा,कोरची-बोटेकसा रस्ता ता.कोरची, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता.अहेरी, जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा, पोर्ला-वडधा रस्ता ता.कुरखेडा, वैरागड-जोगिसाखरा-शंकरपुर-चोप कोरेगाव रस्ता ता.देसाईगंज (वडसा) इत्यादी मार्ग पुरामुळे बंद पडली आहेत.