बल्लारपूर : एका अज्ञात 25 वर्षीय युवकाचा रेल्वे गाडी ने मृत्यू झाल्याची घटना विसापुर गावात सकाळी 7.30 वाजता उघडकीस आली. माहितीनुसार आज सकाळी बल्लारशाह बाबुपेठ सेक्शन किमी नं ८८५/२१ - २३ अप लाईन वर एक अज्ञात अंदाजे 25 वर्षीय युवकाचे शव रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली.
यावरून आरपीएफ चे सहाय्यक उपनिरीक्षक रामलखन व सिपाही शरद कुमार घटनास्थळी पोहोचले तसेच त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. या वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी घटनास्थळी भेट देत शवाचा पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
Ballarpur: The death of an unknown 25-year-old youth by a train came to light in Visapur village at 7.30 am. According to information, the dead body of an unidentified youth of approximately 25 years was seen by the railway staff this morning on Ballarshah Babupeth section km no 885/21 - 23 up line. He informed the seniors about this.
RPF Assistant Sub-Inspector Ram Lakhan and Constable Sharad Kumar reached the spot and gave information at Ballarpur Police Station. According to this, Assistant Police Inspector Amit Kumar Pandey visited the spot and conducted panchnama of the dead body and sent it to Rural Hospital Ballarpur for dissection. Ballarpur Police is conducting further investigation.