तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कळमगाव-सिंदेवाही रोडवरील उमा नदीवर छोटा पुल असल्याने दरवर्षी पावसामध्ये मार्ग बंद होत असल्याने त्याठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्या सोबतच मागील सहा महिन्यापूर्वी रस्त्याचे सुद्धा बांधकाम करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात सदर रस्ता वाहून गेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या सर्व बसेस बंद झाल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत.
सिंदेवाही शहराला जोडणारा कळमगाव रस्ता आणि त्यावरील पुल बनविण्यासाठी शासनाने करोडो रुपयाचा निधी खर्च केला. मागील सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन नुकतेच एक महिन्यापूर्वी या मार्गावरून बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र पहिल्याच पावसात सदर रस्ता वाहून गेला असून रस्त्यावर अंदाजे सहा फूट खोल भगडाड पडले आहे.
यावरून असे दिसून येते की, सदर रस्त्याचा दर्जा किती चांगला असेल. सिंदेवाही तालुक्यातील पारना, सिरकाडा, शिवणी, वासेरा, गडबोरी, रामाळा, पांढरवानी, पिपरहेटी, जामासाळा जुना, नवीन, मोहाडी, नलेश्वर, कुकडहेटी, विसापूर, कळमगाव, चारगाव, इटोली, पांगडी, मोहबोडी, इत्यादी गावातील शेकडो विद्यार्थी सिंदेवाही या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र सदर वाहून गेल्याने या रस्त्यावरील जाणाऱ्या सर्व बसेस झाल्या. त्यामुळे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्वरित याकडे लक्ष घालून रस्ता तयार करावा. अशी मागणी शेकडो पालकांनी केली आहे.