Chandrapur Suicide: नऊ महिन्याच्या बाळाला विष पाजत आईने घेतला गळफास | Batmi Express

Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,Warora,Warora News,Waro

Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,Warora,Warora News,Warora Murder,

वरोरा:-
 वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (27) असे असुन स्मित मितेश पारोधे (9 महिने ) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Read Also: आनंदवनात प्रेमप्रकरणातून 24 वर्षीय तरुणीची हत्या

प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला. आत्महत्येचा कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे.

Read Also: ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून पोलिसांनी आरोपीला 24 तासांत केले जेरबंद…हत्या नंतर चक्क आरोपीने.

माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच?

मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचे पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.