खमारी/बुटी : भंडारा तालुक्यातील पलाडी शेतशिवारात शेतात राखचे भरण टाकत असतांना टिप्पर उतारावर लावून भरण खाली करुन टिप्पर समोर घेत असतांना टिप्परचे प्रेशर कमी झाल्याने टिप्परचा डाला विद्युत तारेला स्पर्श झाल्याने टिप्परला हात धरुन असलेल्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दि.१३ जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजतादरम्यान घडली. शिवम जीतसिंग सावंत (१९) रा. दवनीवाडा असे मृतकाचे नाव आहे.
पलाडी शेतशिवारातील घटना:
मृतक हा टिप्परवर वाहक म्हणून कामावर होता. दि. १३ जून रोजी सायंकाळी अदानी पावर प्लँट तिरोडा येथून राख घेऊन पलाडी शेतशिवारातील प्रतिक खंडाईत यांच्या शेतात भरण भरण्यासाठी आले होते. भरण खाली केल्यानंतर चालक रामेश्वर परीहार (२८) रा.दवनीवाडा याने टिप्पर समोर घेत असतांना टिप्परचे पे्रशन कमी झाल्याने समोर असलेल्या इलेक्ट्रीक पोलच्या ताराला वर उचललेला टिप्परचा डाला लागला. त्यामूळे जिवंत विद्युत तारेचा टिप्परच्या डाल्याला करंट आला असतांना वाहक शिवम याने हात लावला. तेव्हा त्याला विद्युतधक्का बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व पे्रत शवविच्छदनाकरीता पाठविले. घटनेचा पुढील तपास पो.हवा.पुरुषोत्तम थेर, पो.शि. किरण नवघरे करीत आहेत.