वडसा (गडचिरोली): वडसा वरून आरमोरी मार्गे 1 किलोमिटर अंतरावर वन विभाग वडसा जवळील टर्निंग पॉईंटवर दुचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक-16 मे रोजी दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर युवक बाहेर ठिकाणाहून वडसा मार्गे दुचाकीने जात होता. मात्र अचानक वन विभाग वडसा जवळील टर्निंग पॉईंटवर इतर वाहनांची रेलचेल सुरू असल्याने दुचाकी वाहन क्रमांक- एम एच 36 ए एम 7721 अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला दुचाकी व युवक पडला. त्यात त्याचा उजवा पाय मोडला असून डोक्याचा भाग चेंदामेंदा झाल्याचे घटनेवरून दिसून येते. जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव श्रीकृष्ण राजकुमार वंजारी, वय 32 वर्षे रा. आसगाव, पवनी असे आहे. तसेच सदर युवक इंजिनिअर असल्याचे कळते. सदर घटनेची माहिती वडसा पोलीस प्रशासनास दिली असून युवकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास वडसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा पोलीस प्रशासन करीत आहे.