बल्लारपूर : बकरी चारायला गेलेला इसमाचे वाघाने बळी घेतल्याची घटना तालुक्यातील कळमना जंगलात घडली. तालुक्यातील कोर्टिमक्ता येथील रहिवासी वामन गणपती टेकाम (५९) हे आज सकाळी ८.३० वाजताचे सुमारास नियतक्षेत्र कळमना मधील जंगलात बकरी चारण्यासाठी गेले. तिथे गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना सदर इसम वनात बकरी चारत असल्याचे दिसताच त्यांना वनाच्या बाहेर काढण्यात आले व परत वनकर्मचारी हे गस्तीवर समोर निघुन गेले. परंतु सदर इसम हा पुन्हा बकऱ्या चारण्यासाठी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमना मधील राखीव वनखंड क्रमांक ५१४ ए मध्ये गेला असता दुपारी १२ वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन त्यांना जागीच ठार मारल्याची घटना घडली.
घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर होऊन सदर ठीकानाची पाहणी केली असता वाघाचे हल्यात वामन गणपती टेकाम यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवून शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानुग्रह आर्थिक मदत देण्यात आले.
सदर परिसरात गस्त वाढणविण्यात आले असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता २० ट्रॅप कॅमेरे व १ लाईव्ह कैमेरा लावण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
बल्हारशाह कळमना जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये, असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे.