कोरची (गडचिरोली) :- कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेतकाठी गावातील रोजी-मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील पतीने घरगुती वादातून राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर तीन वेळा धारदार कुऱ्हाडीने सपा-सप मारून हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी पहाटे 3 वाजता दरम्यान घडली आहे. या प्रकरणातील आरोपी रोहिदास बिरसिंग बंजारा (40) रा.बेतकाठी याला 3 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Read Also:पतीने झोपलेल्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने मारून केली हत्या; बेतकाठी गावातील थरारक घटना
अमरोतीन रोहिदास बंजारा (33) रा.बेतकाठी असे मृतक पत्नीचे नाव आहे. बुधवारच्या पहाटे 3 वाजता दरम्यान पत्नीला कुऱ्हाडीने ठार केल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत वाबळे हे करीत आहेत.