आरमोरी :- महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत दि. 21/05/2024 ला जाहीर झालेल्या बोर्ड परीक्षेत हितकारिणी ज्यू. कॉलेज आरमोरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी सत्कार समारंभ घेण्यात आला त्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शेबे साहेब, अध्यक्ष शाळा समिती, कॉलेजचे प्राचार्य मा. फुलझेले, कला शाखा प्रमुख प्रा.कु. शेंडे, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. प्रधान उपस्थित होते.
एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 निकाल :एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 निकाल :
- कला शाखा. 90.47%
- वाणिज्य शाखा. 100%
- विज्ञान शाखा. 100%
- प्राविण्य श्रेणी - 03
- प्रथम श्रेणी - 23
- द्वितीय श्रेणी - 83
- पास - 43 विद्यार्थी पास
झालेले आहेत
कला शाखेत प्रथम कु. हेमा गुरुदेव राऊत (68.50%), द्वितीय कु. करिष्मा चंद्रकांत दोनाडकर (68.17%), तृतीय मंगेश सुरेश ढोरे (68%), वाणिज्य विभाग प्रथम कु. वैष्णवी संजय तुपट (79%), द्वितीय कु.समीक्षा नारायण दिवठे (78.50%), तृतीय कु. रेणुका लीलाधर ढोरे (75%), विज्ञान विभाग प्रथम गौरव संजय चरडुके (69.17%) द्वितीय कु. लतिका यशवंत शेंडे (65%) तृतीय डेव्हीड हिरालाल प्रधान (64%)आहेत
संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष मा. अशोकराव वाकडे, मा. तुळशीराम गोंदोळे, सचिव मा. तेजराव बोरकर, शाळा समिती अध्यक्ष मा. काशीराम शेबे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य जय फुलझेले, तथा प्रा. दोनाडकर, प्रा. सहारे, प्रा. सेलोकर,प्रा. कु. डहारे प्रा. कु. साळवे, प्रा. कु. मेश्राम, प्रा. राखाडे व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी अभिनंदन व गौरव केले.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रधान व आभार प्रा. सहारे यांनी केले.