Maharashtra SSC Result 2024: : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 99.01 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94.73 टक्के लागला आहे.यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात 1.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्यातील तब्बल 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2024 मध्ये घेतलेली दहावीची परीक्षा दिली. त्यातील 14 लाख 84 हजार 441 म्हणजेच 95.81 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थ्यांची आकडेवारी:
- एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी : 8,59,478
- एकूण परीक्षेला बसले मुले: 8,44,116
- एकूण परीक्षेला बसले मुली: 8,44,116
- निकालाची टक्केवारी : 95.81 टक्के
- मुलींचा निकाल: 97.21 टक्के
- मुलांचा निकाल: 94.56 टक्के
पुणे : 2,62,949 : 2,53,600 : 96.44 टक्के
नागपूर : 1,49,897 : 1,42,005 : 94.73 टक्के
औरंगाबाद : 1,82,844 : 1,74,056 : 95.19 टक्के
मुंबई : 3,39,269 : 3,25,142: 95.19 टक्के
कोल्हापूर : 1,27,818 : 1,24,567 : 97.45 टक्के
अमरावती : 1,59,684: 1,52,631: 95.58 टक्के
नाशिक : 1,95,582 : 1,86,352 : 95.28 टक्के
लातूर : 1,04,503 : 99,517 : 95.27 टक्के
कोकण : 26,780: 26,517 : 99.01 टक्के