बल्लारपूर (चंद्रपूर):- बल्लारशाह वन परिक्षेत्रातील कारवा जंगल परिसरात वाघाने मागील तीन महिन्यात चार जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे नागरिकांत वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये सुद्धा वन विभागाप्रति रोष निर्माण झाला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी कारवा बल्लारपूर जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले होते. मानवी रक्ताला चटावलेल्या या टी 86 एम नर वाघाला जेरबंद करण्यात अखेर बल्लारशाह वनविभागाला सोमवारी दिनांक -29 रात्रीच्या सुमारास यश आले आहे.
सदर ची कारवाई बल्लारशाह वन विभागाच्या पथकाने फत्ते केली.बल्लारशाह वन विभागात नर वाघाने तीन महिन्यापासून कारवा-बल्लारपूर जंगलात चांगलाच धुमाकूळ घातला होता.या वाघाने आजतगायत चार जणांचा बळी घेऊन वन विभागाला जेरीश आणले होते. यामुळे या वाघाला पकडण्यासाठी बल्लारशाह प्रादेशिक वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून मोहीम सुरू केली होती. यासाठी वनविभागाचे कर्माचारी रात्रदिवस गस्त करत होते.गस्ती दरम्यान सोमवारी सायंकाळी टी-86-एम वाघ कारवा बल्लारपूर जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आला.यावेळी अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला बंदुकीचा नेम साधून इंजक्शनद्वारे बेशुद्ध केले. बेशुद्ध वाघाची वैद्यकिय तपासणी करून जेरबंद करण्यात आले. सदर वाघ हा 10 वर्षाचा असून पिंजऱ्यात पकडून वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.ही कारवाई मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचा मार्गदर्शनात सहायक वैनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या नेतृत्वात बल्लारशाहचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,क्षेत्र सहायक के.एन.घुगलोत, ए.एस.पठाण,पी.व्ही. रामटेके, एस.एम.बोकडे, आर.एस.दुर्योधन, डी.बी.मेश्राम,ए.बी.चौधरी,एस.आर.देशमुख, बी.एम.वनकर, पी.एच.आनकडे,टी.ओ.कांबळे आदींच्या पथकाने केली.