कुरखेडा: कूरखेडा-कढोली मार्गावर खरकाडा जवळील वाघदेव देवस्थानाजवळ दोन दूचाकीची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही दूचाकी स्वारासह एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दूपारी 12 वाजताच्या सूमारास घडली आहे.
चंद्रपुर जिल्हातील नेरी ता. चिमूर येथील वैजू सुधाकर उपरकर (३५) हे काही कामा निमीत्य कूरखेडा येथे येत कूरखेडा-कढोली मार्गे दूचाकी वाहनाने जात असताना, याच वेळी कढोली येथून कूरखेडा कडे प्रद्युम्न दखने (३०) व त्याची आई तूळजाबाई दखने (६५) रा.दोडके ता.कोरची हे येत असताना वाघदेव देवस्थानाजवळ दोन्ही वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने अमोरासमोर धडक झाली. दोन्ही चालकासह महिला गंभीर जखमी झाली लगेच त्याना रूग्नवाहीकेने कूरखेडा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर वैजू उपरकर यांची परीस्थिती गंभीर असल्याने त्याना खाजगी रुग्णालय ब्रम्हपूरी येथे हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद पोलीस स्टेशन कूरखेडा येथे करण्यात आली आहे.