⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Big News: देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
: देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे .

काल दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे रा. नेलगंडा, तह. भामरागड जि. गडचिरोली असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंडा जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढीवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्हात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता

शासनाने जाहिर केलेले बक्षीस. महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच  पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.