जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून स्ट्राँगरूमची पाहणी
गडचिरोली : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात काल 19 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सायंकाळपासून मतपेट्या (इव्हीएम मतदानयंत्र) गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयात स्थापन केलेल्या स्ट्राँग रूम मध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. दुर्गम व संवेवदनशील भागातील इव्हिएम उद्या सायंकाळ किंवा परवापर्यंत पोहचणार आहेत.
मतमोजणी प्रक्रियेला ४ जून रोजी सुरूवात होणार असनू तोपर्यंत या इव्हिएम मशीन येथील स्ट्राँगरूमध्ये कडेकोट बंदोबस्तात राहणार आहेत. येथील स्ट्राँग रुम सुरक्षा यंत्रणेची पाहणी जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी केली. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचनाही केल्या.
मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत स्पष्ट होणार :
गडचिरोली जिल्ह्यातील काही मतदान केद्र दुर्गम व संवेदनशील भागात असल्याने तेथील मतदान यंत्र येण्यास तसेच मतदानाची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब लागणार असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी स्पष्ट केले आहे. आज रात्री उशीरापर्यंत सर्व मतदार संघातील अंतिम आकडेवारी प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आमगाव, ब्रम्हपुरी व चिमुर या विधानसभा मतदार संघातील आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार आमगाव विधानसभा मतदार संघात 69.24, चिमूर विधानसभा मतदार संघात 74.41 टक्के आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात 75.10 टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.