गडचिरोली :- आजकाल युवामध्येही हार्टअटॅकचा धोका वाढला असुन पोलीस भरतीची तयारी करणार्या युवकास हार्टअटॅकमुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे घडली.
सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी ता. गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे किरायाची खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो नियमित जिल्हा क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी जात होता. दरम्यान, काल मंगळवारी सकाळी सराव करताना काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखणे सुरू झाले.
Read Also:
ट्रकच्या व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर तर नातवंड जखमी
त्यानंतर तो मित्रांसोबत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच ठिकाणी तो चक्कर येऊन पडला. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरज हा पोलीस खात्यात भरती होऊन सुखी जिवनाची स्वप्ने रंगवित होता. मात्र त्याला नियतिने गाठल्याने त्याच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे. या संदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. सूरजच्या निधनाने गावात शोककळा पसरली .