गडचिरोली:- स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी-ट्रॅक्टरच्या समाेरासमाेर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली- गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. (Fatal Accident)
राजू झुरू आत्राम (४८) व करिश्मा राजू आत्राम (२१) रा. देवपहाडी असे अपघातात ठार झालेले वडील व लेकीचे नाव आहे. तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावरील देवपहाडी येथून राजू आत्राम हे आपल्या लेकीसह माेटारसायकलने एटापल्लीला येत होते. दरम्यान एटापल्लीवरून सिमेंट बॅग व स्टील (लाेखंड) घेऊन ट्रॅक्टर एटापल्लीवरून गट्टामार्गे जात होते.
दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर समाेरासमाेर धडक झाली. यात मोटार सायकलचालक राजू आत्राम हे जागीच ठार झाले तर मुलगी करिश्मा ही गंभीर जखमी झाली. तिला एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे हलविण्यात आले; परंतु चार्मोर्शीजवळ तिचाही मृत्यू झाला.