वर्धा:- वर्ध्यातील (Wardha Suicide News) पारडी येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Couple Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महल्या केलेल्या प्रेमीयुगुलामध्ये मुलगी अल्पवयीन आहे.
विहीरीत प्रेमीयुगुलाने (Couple Suicide) विहीरीत उडी घेऊन जीवन संपविले. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने दोघांनी एकत्र राहू शकत नाही तर एकत्र जीवन संपवू टाकू, असा निर्णय घेत विहीरीत उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.
घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचे विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना वर्ध्याच्या तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे घडली आहे. दोघेही कुटुंबीयांचा विरोध झुगारून पळून गेल्याची माहिती आहे. मृतकामध्ये हर्षल वाघाडे या 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे तर मुलगी अल्पवयीन आहे. दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.