ब्रम्हपुरी: आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मौजा चिंचोली बु.येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी अगदी सकाळपासून गाव स्वच्छता त्यानंतर दुपारला वकृत्व स्पर्धा व विविध खेळांच्या स्पर्धा आणि सायंकाळला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . तर 19 फेब्रुवारीला सकाळी ठीक आठ वाजता रांगोळी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत गावातील तरुण-तरुणींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बोलकं चित्र आपल्या सुंदर रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले काही स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा तर काहीच स्पर्धकांनी राजमुद्रेचा चित्र सुंदर कलाकृतीने रेखाटले ठीक बारा वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते,
या कार्यक्रमाचे उद्घाटक गावचे प्रथम नागरिक श्री.गजाननजी ढोरे सरपंच चिंचोली तर अध्यक्ष प्राचार्य दामोदरजी शिंगाडे सर यांनी भूषविले उपाध्यक्ष म्हणून रामलालजी ढोरे उपसरपंच चिचोली व्याख्याते विक्रांत ठाकरे दुसरे व्याख्याते भाऊराव राऊत सर,गावाचे सचिव प्रशंताजी राऊत हे होते तर या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून माननीय तुळशीदासजी ढोरे अध्यक्ष नवतरुण नाट्य उत्साही मंडळ चिंचोली उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.संदीपजी ढोरे सर यांनी केली प्रस्ताविकेतूनच चिचोली गावामध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्षांपूर्वी पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गावातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन उभारला असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते विक्रांत जी ठाकरे यांनी आपल्या व्याख्यानातून गावातील संपूर्ण तरुण-तरुणींना आणि बालगोपालांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाबद्दल सुंदर मार्गदर्शन केले, तर दुसरे व्याख्याते राऊत सर यांनी व्यक्तिमधील योग्य कला गुण ओळखून त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य शिंगाडे सर यांनी आजच्या घडीला शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादित केले सोबतच संघटित होऊन संघर्ष करण्याचा मोलाचा संदेशही दिला. त्यानंतर संपूर्ण गावांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली महाप्रसाद वाटून कार्यक्रमाचे शेवट झाला.