ब्रम्हपुरी (लाडज) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथून पळवून नेणाऱ्या राजस्थान येथील एका आरोपीला ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. जितेश रामबाबू जगा असे आरोपीचे नाव आहे. जयपूर हे राजस्थान मधील असल्याची माहिती आली आहे.
आरोपीने लाडज येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मुलीच्या कुटुंबीयांना न सांगता पळवून नेल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ आरोपीचा माग काढत मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा:- चंद्रपूर: खर्रा खाल्ल्याने बेंबाळ येथील युवकाचा मृत्यू ?
उक्त प्रात्यक्षिक ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस अधिकारी डॉ. इन्स्पेक्टर अनिल जित्तावार,पो.उपानी निशांत.जुनोनकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार योगेश, पोलीस कॉन्स्टेबल संदेश, पो.नि.विजय,मुकेश,प्रमोद,शिल्पा यांच्या पथकाने केली.