आरमोरी: गळफास घेऊन इसमाची आत्महत्या | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Suicide,Armori,Armori News,Armori Suicide,Armori Crime,

Bramhapuri,Bramhapuri Suicide,Armori,Armori News,Armori Suicide,Armori Crime,

आरमोरी: - आरमोरी-ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी मार्गावर असलेल्या जीवानी राईस मिलच्या मागे असलेल्या सुबाभळीच्या झाडाला गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आरमोरी येथील नागरिकांच्या निदर्शनास आली. सदर आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव संदीप शामराव ठाकरे (३०) रा. आवळगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा दोन- तीन दिवसापूर्वी गडचिरोली येथे काही कामानिमित्त गेलेला होता. काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान सदर युवक हा गडचिरोली वरून आरमोरी येथे परत आला असल्याचे त्याच्या खिशात आढळुन आलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या तिकीटवरून कळल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु सदर युवक हा आपल्या आवळगाव येथे न जाता आरमोरी - ब्रम्हपुरी रोडवरील जीवांनी राईस मिलच्या मागे असलेल्या सुबाभळीच्या झाडाजवळ जाऊन रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी ८ वाजता राइस मिल मधील काही काम करणाऱ्या कामगारांना त्याचे प्रेत झाडाला लोंबकळत असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी आरमोरी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरमोरी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.