OBC Students: ओबीसी विद्यार्थ्यांना शासन देणार 60000 रुपये | Batmi Express

Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,Maharashtra Today,OBC Students,OBC News,OBC Students 60,000 Rs,

Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,Maharashtra Today,OBC Students,OBC News,OBC Students 60,000 Rs,

OBC Students:
 
शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" सुरू केली आहे. त्या माध्यमातून SC आणि ST विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता OBC विद्यार्थ्यांना ही मिळणार आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा SC आणि ST वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख मदत मिळायची. मात्र आता शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांनाही आधार योजनेच्या माध्यमातून रोख मदत देण्याचे ठरविले आहे. 

राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे शासनाने त्या संदर्भातला जीआर ही आज काढला आहे.


ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना कशी असेल?

  • मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई, नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षामागे 60 हजार रु मिळतील.
  • संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रु मिळतील.

जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रु मिळतील..

तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याना 38 हजार रु मिळतील. या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जातील.

GR डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

http://tinyurl.com/3puur4r9 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.