गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील सहा महिलांचा वैनगंगा नदीत नाव बुडून 23 जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यु झाला. या सहा महीलापैकी मिळालेल्या मृतदेहांची संख्या पाच झाली असून एका बेपत्ता महिलेचा शोध सुरू आहे
25 जानेवारीच्या दुपारी साडे बारा वाजता सुषमा सचिन राऊत वय 25 वर्ष व साडे तीन च्या सुमारास बुधाबाई देवाजी राऊत वय 55 वर्ष हीचा मृतदेह जैरामपूर नदीघाटावर आढळून आला. तर मायाबाई राउत या बेपत्ता महिलेचा शोध अद्यापही सुरूच आहे. यासाठी एन डी आर एफ चे पथक शोध घेत असून यासाठी गावकरी सुध्दा परिश्रम घेत आहेत.
सहा मृत महीलापैकी आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे रेवंता झाडे, सुषमा राउत, बुधाबाई राऊत, यांचे मृतदेह सापडले असून माया बाई राऊत हीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे