पोस्ट्स

ब्रम्हपुरी: ट्रकने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडले; समीक्षाचा जागीच मृत्यू | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News,Accident

Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri News,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News,Accident

ब्रम्हपुरी
:
 शहरात डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या अंगावरून ट्रकच्या मागील चाक मुलीच्या गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा म्हणजेच समीक्षाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:45 वाजेच्या दरम्यान नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ खळबळजनक घटना घडली. 

समीक्षा संतोष चहांदे वय (17) वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.

समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती. ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाका खाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे. प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह सेवाविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.


सूचना : बातमी लेखनात अपडेट होत आहे. 

बातमी लेखनात थोडे बदल - 1/17/2024

  • ट्रकची धडक की मुलीची सायकल झाली स्लिप - यावर अपडेट होत आहे. 
  • सध्या टीम कडे दोन अपडेट आल्या आहेत. 
  • ब्रम्हपुरी पोलिस टीम ची अपडेट आली की बातमी लेखन अपडेट होईल. 
  • वरील बातमी लेखनात दोन मते दर्शविली आहेत. 
टीम
बातमी एक्सप्रेस वृतसेवा 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.