आरमोरी तालुक्यातील मेंढा येथे दुचाकीवरून शेतात गेलेला शेतकरी मृतावस्थेत आढळला | Batmi Express

Armori,Armori Crime,Armori Live,Armori News,Vairagad,

नागपूर - मोबाइल का बघतेस यावरून मुलींसोबत वाद; आईची आत्महत्या,Nagpur Suicide,suicide,suicide news,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur

वैरागड : आरमोरी तालुक्यातील मेंढा (वडेगाव) येथे दुचाकीवरून शेतात गेलेला शेतकरी मृतावस्थेत आढळून आला. ही घटना ४ जानेवारीला उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे.

ज्ञानेश्वर किसन शेंडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ३ जानेवारीला ते दुचाकीवरून शेतात गेले होते. मात्र, सायंकाळी घरी परतलेच नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ते आढळले नाही. ४ जानेवारीला शेतात काही महिला गुरे चारण्यासाठी गेल्या असता त्यांना ज्ञानेश्वर शेंडे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावातील नागरिक गोळा झाले. पोलिस पाटलांनी धानोरा पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून सूचना दिली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला, धानोरा पोलिस तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.