ग्रामपंचायत पुराडा हद्दीतील घटना…
देवरी: तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायत पुराडा अंतर्गत तसेच सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील गडेवारटोला परिसरातील शिवचरण आचले यांच्या शेत शिवारात आज सकाळी 10.00 वाजता दरम्यान एक युवक फासावर लटकवला आणि युवतीचे मृतदेह शेतात पडलेल्या स्थितीत आढळून आले. वरील घटनेची नोंद सालेकसा पोलीस स्टेशन येथे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत पुराडा अंतर्गत सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गडेवारटोला परिसरातील शिवचरण आचले यांच्या शेतशिवारात नामे, श्रीकांत कापगते वय 23 रा. गडेवारटोला/पुराडा या युवकाचे मृतदेह शेतातील पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास स्थितीत आढळले. तसेच नामे कुमारी टिकेश्वरी मिरी वय 21 रा. फुक्किमेटा /हलबीटोला या युवतीचे मृतदेह शेतात पडून आढळलेले आहे. मृत युवतीच्या नाका तोंडावाटे रक्त वाहिल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये हत्या की आत्महत्या या चर्चेला उथान आले आहे. सालेकसा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे पाठविण्यात आले आहेत.पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत.By: बोरगाव/ देवरी /संदेश मेश्राम