कोरची- आज दिनांक 3 डिसेंबर 2023 ला जागतिक दिव्यांग दिन समता दिन म्हणून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. ही प्रभात फेरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची येथुन काढण्यात आली व त्याच ठिकाणी प्रस्थान करून येथे दिव्यांग विद्यार्थी व जागतिक दिव्यांग दिन विषयी सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची, श्रीराम विद्यालय कोरची व पारबताबाई विद्यालय कोरची या तिन शाळेचा समावेश होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सन्माननीय श्री अमित दास साहेब गटशिक्षणाधिकारी गट साधन केंद्र कोरची, श्री नंदकुमार गोबाडे सर प्राचार्य श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची, श्री महेश चौधरी सर माध्यमिक शिक्षक पारबताबाई विद्यालय कोरची, सौ. प्रमोदीनी काटेंगे मॅडम मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची व तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक , परिचर व गट साधन केंद्र कोरची कार्यालयातील सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.
उपरोक्त रॅली प्रसंगी दिव्यांग दिन समता दिन निमित्त मान्यवरांनी विशेष असे समावेशित शिक्षण व मिळणारे शैक्षणिक सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून मुलांचे आनंद द्विगुणित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी वाघमारे विशेष तज्ज्ञ गट साधन केंद्र कोरची यांनी केले तर आभार राजकुमार आडे विशेष शिक्षक यांनी मानले.