आष्टी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे अवैध रेती उपसा करुन रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रेती घाटाचे लिलाव न झाल्याने वैनगंगा नदीपात्रातील रेती उपसा करून आष्टी येथे अवैध मार्गाने विक्रीसाठी ट्रॅक्टरने नेत असताना चामोर्शी तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस डी गुरनुले यांनी मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असलेला, रेती भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ बी आर २३१० हिला तलाठी यांनी अडविला असता त्या ट्रॅक्टर मध्ये अवैध रेती दिसून आली तेव्हा त्या ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई मुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत