गडचिरोली, दि. 20 :- जिल्हयातील अतिदुर्गम भागातील भामरागड तालुक्यातील रस्ता बांधकामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केल्याची घटना आज 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मागील काही दिवसांपासून हिदुर-दोबुर-पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम सुरु होते. दरम्यान या रस्ता कामावरील वाहने नेहमीप्रमाणे हिदुर गावात ठेवली असता काल 19 डिसेंबर रोजी रात्रो नक्षली त्या ठिकाणी पोहचले व वाहनांची जाळपोळ केली. यात तीन ट्राक्टर आणि एक जेसीबीचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयात नक्षल्यांचे तांडव सुरुच असुन भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने संबंधित कत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकेही टाकली असुन 22 डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे