Corona Sub-variant JN.1: देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा तणाव वाढतच आहे. दरम्यान, कोविड-19 च्या उप-प्रकार JN.1 (Corona Sub-variant JN.1) च्या 21 प्रकरणांची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कोविड-19 उप-प्रकार JN.1 च्या नवीन 21 प्रकरणांपैकी 19 गोव्यात नोंदवले गेले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकरणांबाबत, नीती आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की घाबरण्याची गरज नाही. पॉल म्हणाले की, कोरोनाने बाधित सुमारे 91 ते 92 टक्के लोक घरी उपचाराचा पर्याय निवडत आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले की, रुग्णांची संख्या वाढत असली तरी ९२.८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत, जे सौम्य आजाराचे संकेत देतात. तसेच, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोना विषाणूच्या JN.1 ला 'रुचीचे प्रकार / वैरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून संबोधले आणि म्हटले की त्यामुळे जास्त धोका नाही.
तयारीसंदर्भात बैठक
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावे लागेल, असे मांडविया यांनी बैठकीनंतर सांगितले.
आज देश के सभी राज्यों एवं UTs के स्वास्थ्य मंत्रियों व वरिष्ठ अधिकारियों के साथ respiratory illnesses (कोविड-19 समेत) और public health संबंधित तैयारियों को लेकर समीक्षा बैठक की।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 20, 2023
बैठक में सभी राज्यों ने स्वास्थ्य सुविधाओं के बेहतर क्रियान्वयन हेतु सकारात्मक दृष्टिकोण रखा। pic.twitter.com/rYkDCIkg2F
देशात किती प्रकरणे आहेत ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूची 614 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, कोविड-19 रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली आहे.