अकोला: शालेय अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायण यांचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून एनसीईआरटी ने याला मान्यता दिल्याचे सांगण्यात सुध्दा येत आहे.. एनसीईआरटीच्या सोशल सायन्स समितीने याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविला आहे. समितीने वैदिक गणितासह वेद आणि आयुर्वेदही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान होणे गरजेचे असल्यामुळे धार्मिक शिक्षण देणे फार महत्त्वपूर्ण आहे.
परंतु भारतीय संस्कृतीला निगडित असलेले भारतामध्ये अनेक धर्माची लोक गुण्यागोविंदाने आनंदाने राहत आहेत भारतीय संस्कृतीमध्ये विविधता नटलेली आहे आणि विविधतेमधूनच भारताचा विकास होत आहे. परंतु भारतीय संस्कृती शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवीत असताना महाभारत व रामायण यासह सर्वच धर्मग्रंथांचा अभ्यास शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मिळावा; जेणेकरून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीमधील विविधता व त्या माध्यमातून भारतीय देश कसा नटलेला आहे याचाही अभ्यास होईल. शालेय जीवनामध्ये सर्वच जाती-धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात; हिंदू संस्कृती बरोबरच ख्रिश्चन, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध व पारसी अशा विविध धर्म संस्कृती भारतामध्ये आजही अवगत आहेत. भारतीय संस्कृती शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवीत असताना इतर धर्मातील संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळायला हवे. एनसीआरटीने संपूर्ण धार्मिक ग्रंथांचा सुद्धा शालेय जीवनामध्ये समावेश करावा. धार्मिक संस्कृतीबरोबरच भारतीय संविधानाचाही अभ्यास विद्यार्थ्यांना व्हायलाच पाहिजे. भारतीय संविधान दिवस साजरा होऊन, संविधानाचे नैतीक मूल्य, विविध कलम, समानता व न्याय आदींची नागरिकांना जाणीव व्हावी, म्हणून शालेय जीवनातही सविधानाचा अभ्यासक्रमात समावेश केला तर निश्चितच सविधान जागृती व प्रचाराला वाव मिळेल. भारतीय संस्कृतीचा, मूल्यांचा, नैतिक तत्त्वांचा शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झाल्यास निश्चितच भारतीय संस्कृती टिकून राहील आणि येणारी पिढी भारत देशाचा निश्चितच विकास घडवेल.
लेखकः
- प्रा. प्रज्ञानंद थोरात, पत्रकार व शिक्षक, अकोला
मो. 9822674487