लाखनी:- शहरातील एका विवाहित महिलेला कैचीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना 22 डिसेंबर रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी तुषार रामचंद्र बुरडे (36) रा. काटी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला लाखनी शहरात उदरनिर्वाहासाठी ब्युटीपार्लर चालविते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान आरोपी तुषार हा दुचाकीने येऊन पीडितच्या ब्युटीपार्लरमध्ये सरसकट प्रवेश केला. तिला कैचीने मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिला अश्लिल शिवीगाळ करीत तिचे केस ओढून थापडाने मारहाण केली.
याप्रकरणाची पीडित महीलेने लाखनी पोलिस ठाण्यात तोंडी बयान नोंदविले. तक्रारीवरून लाखनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आरोपी
तुषार बुरडे याच्याविरुद्ध कलम 418/2023 धारा 376, (2) (एन), 342, 323, 504,506 आईपीसी, 3(1) (डब्ल्यू) (आई) (ii), 3 (2) (5), (5ए) अनिसूचित जाति जनजाति अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग करीत आहेत.