वडसा: कोरेगाव / चोप दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने, एक जण जागीच ठार, तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना वडसा (देसाईगंज ) तालुक्याच्या कोरेगाव येथे घडली.
प्रभाकर तुळशीराम मेश्राम (३५) रा. बोळधा हे जागीच ठार झाले, तर धनराज हरी गायकवाड (४०) व पितांबर रतिराम गायकवाड (३२) दोघेही राहणार बोळधा हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांना वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
विशेष अपघात म्हणजे, दोन्ही मोटारसायकलस्वार एकाच गावातील असून, प्रभाकर तुळशीराम मेश्राम हा कोरेगाववरून बोळधाकडे, तर धनराज गायकवाड व पितांबर गायकवाड हे दोघेही बोळधावरून कोरेगावकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, कोरेगावजवळच्या
हनुमान व्यायाम शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात प्रभाकर मेश्राम हे जागीच ठार झाले. पितांबर गायकवाड यांच्या पायाला जबर मार लागला, तर धनराज गायकवाड हा किरकोळ जखमी झाला. दोन्ही जखमींना वडसा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. प्रभाकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. या घटनेचा अधिक तपास पीएसआय धनगर हे करीत आहेत.