राजापूर: तालुक्यातील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषद मधून दोन वेग वेगळी विकास कामे करण्यात आले त्यातील नारकर वाडी येथील साकवाचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झालेलं आहे पुर्ण साकव हा फक्त ६ महिन्यात ढासळून अवस्था अतिशय बिकट आहे. साकवाचे काम हे लाकडी फळ्या , सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या टाकून काँक्रिट करण्यात आले आहे. तसेच बौध्दवाडी रस्त्याची सुध्दा परस्थिती अतिशय बिकट आहे, सदर रस्त्याच्या अंदाजपत्रका मध्ये ५ मीटरची मोरी असुन रस्ता मध्ये कुठेही मोरी टाकलेली दिसत नाही मात्र सदर मोरीचे पैसे अधिकाऱ्यांच्या संगमताने काढण्यात आलेले आहेत, रस्त्यावर डांबर तर पुर्ण टाकलेले नाही त्यामुळे रस्त्याची खडी पुर्ण उकरून आलेले आहे.
या दोन्ही कामाची सखोल चौकशी करुन संबधीत ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडून करण्यात आली आहे तसे पत्रच आज गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे, त्यावेळी उपस्थितीत विभाग संघटक श्री प्रशांत ( दादा) चव्हाण , उपतालुका अध्यक्ष श्री प्रदिप कणेरे, विभागअध्यक्ष श्री शंकर पटकारे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.