गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यातर्फे 01/11/2023 ला पेट (पी एच डी) परीक्षा आयोजित केली होती त्या परीक्षेचा रिझल्ट 24 /11/ 2023 ला विद्यापीठाच्या वेबसाईटवर घोषित करण्यात आला परंतु 24 तारखेपासून अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा रिझल्ट दिसतच नाहीये काही विद्यार्थ्यांचे प्रोफाईल ओपन होत आहे तर रिझल्ट दाखवत नाही तर काही जणांचे युझरआयडी पासवर्ड इन करेक्ट आहे म्हणून मेसेज येत आहे.
त्यामुळे याची चौकशी साठी रजिस्टार डॉ अनिल हिरेखान यांचे नाव व टेलिफोन नंबर 07132 223104 हा नंबर दिलेला पण या नंबर वर फोन केले असता तो कोणीही उचलत नाही या नंबर वर दिवसभर जरी फोन केला तरी कोणीही फोन उचलत नाही फक्त्त नावापुरता आहे कि काय असा प्रश्न विध्यार्थ्यांना पडला आहे. तसेच पी एच डी परिपत्रक मध्ये 07132 223320 हा टेलिफोन नंबर दिलेला आहे तो नंबर अस्तित्वात नाही असे उत्तर मिळते मग हे नंबर कशासाठी आहे मग विध्यार्थ्यांनी कुठे संपर्क करावा हे विद्यापीठनी सांगावे रिजल्ट लागून आज पाच दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट वेबसाईट वरून डाऊनलोड करता येत नाहीये तरी विद्यापीठांनी याकडे त्वरित लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे समस्या सोडवावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे