- हायलाइट: डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू
नागभीड/चंद्रपुर: दपुम रेल्वे बिलासपूर झोन चे जनरल मॅनेजर यांचा १ डिसेंबर ला गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार असल्याने त्या संबंधित पुर्व तयारी चा आढावा घेण्यासाठी दपुम रेल्वे नागपूर डिव्हीजन मंडल प्रबंधक DRM श्रीमती नमिता त्रिपाठी मॅडम यांचा आज सोमवारी दौरा होता.
चांदाफोर्ट - नागभीड- गोंदिया रेल्वे मार्गाचा दौरा करणार असल्याने डीआरआरएम त्रिपाठी यांना घेण्यासाठी गोंदियावरुन चांदाफोर्ट साठी पहाटे स्पेशल गाडी निघाली. या DRM स्पेशल (SPIC) गाडीने नागभिड - तळोधी रेल्वे मार्ग दरम्यान किटाडी मेंढाजवळ किलोमीटर ११४२/३-४ मध्ये पहाटे ३ वाजताच्या सुमारास रेल्वे मार्गावर आलेल्या वाघाला जबर धडक दिली. यात वाघाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.