Be gallery (बातमी दर्शिवीत _) |
गडचिरोली: प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाघाच्या हल्ल्यात हिरापूर येथील इंदिरा रुमाजी खेडेकर ही महिला ठार झाल्याची घटना आज घडली.
मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा रुमाजी खेडेकर वय 55 मु. हिरापूर पोस्ट. गुरवडा ता. जी. गडचिरोली ही महिला दुपारी आपल्या शेतात गेली होती त्यानंतर शेतालगत असलेल्या झुडपी जंगलामध्ये झाडण्या कापायला गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाई वर अचानक हल्ला केला या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.
इंदिरा रुमाजी खेडेकर - बातमीचा फोटो |
सायंकाळ होऊनही ती महीला शेतातून घरी न आल्यामुळे ही माहिती गावकऱ्यांना मिळताच या महिलेचा शोध दोन-तीन वाजता पासून सुरू होता. परंतु सायंकाळी अंदाजे चारच्या सुमारास त्या महिलेच्या साडीवरून आणि रक्ताच्या ठशावरून जवळच त्या महिलेचा प्रेत आढळून आला.त्यावरून त्या महिलेला वाघाने ठार केले हे लक्षात आले .
हेही नक्की वाचा ⚡🔔 | गडचिरोली: वाघाच्या हल्यात, महिलेचा मृत्यू काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीने घटनास्थळी भेट
त्यामुळे या परिसरात एकच खडबड उडालेली असून या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे .तसेच शेतकऱ्यांनी शेतात जात असताना काळजीपूर्वक कामे करावे , वाघ दिसल्यास वन विभागाला कळवावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.