सिंदेवाही : चंद्रपुर- नागपुर मार्गावरिल किन्ही-मुरमाडी गावालगत अज्ञात वाहनाच्या धड़केत चितळाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवार २० नोव्हेंबर २३ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
माहिती मिळताच वनपरिक्षेञ अधिकारी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले व संपूर्ण घटनेचा पंचनामा करुन मृतक चितळाचा शवविच्छेदन करण्यात आला. मृतक चितळ अंदाजे दोन ते तीन वर्षाचा असल्याची माहीती वनपरिक्षेञ अधिकारी विशाल सालकर यांनी दिली.