कुरखेडा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्याच्या चिचेवाडा बिटातील ठुसी येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव सायत्रा अंताराम बोगा (वय 55) वर्ष रा. ठुसी ता. कुरखेडा जी. गडचिरोली असे आहे.
सदर महिला कुरखेडा (ठुसी) येथील असुन ती शेतीलगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी व झाडू कापण्यासाठी गेली असता अचानक वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले . त्या महिलेचे सायत्रा अंताराम बोगा (वय 55) वर्ष रा. ठुसी असे आहे.
या घटनेची माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या परिसरात वाघाचा वावर नसल्याने सायत्राबाईंना बिबट्याने ठार केले असावे, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेर यांनी व्यक्त केला. सायत्राबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे आहेत.
चिचेवाडा बिटात सध्यातरी वाघाचे लोकेशन नाही. त्यामुळे सायत्रा बाेगा ही महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर हल्लेखोर प्राण्याचे पायाचे ठसे तज्ज्ञ चमूकडून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या चमूच्या अहवालानंतरच हल्ला करणारा प्राणी वाघ की बिबट हे स्पष्ट होईल. हल्लेखोर प्राण्याची दहशत या परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.