⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,

गडचीरोली: 
गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात.

दिनांक 14/10/2023 रोजी जहाल माओवादी नामे चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा, वय 48 वर्षे, रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहगाव जाणा­या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन 2023 साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 13, 16, 18 (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती:

नामे चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा

दलममधील कार्यकाळ

+ दिनांक 26 जुन 2000 ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन 2002 कार्यरत.
+ सन 2002 ला एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2003 पर्यंत कार्यरत.
+ सन 2003 मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2014 पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत.
+ सन 2014 मध्ये डिव्हीसीएम पदावरुन डिमोशन होऊन एसीएम पदावर सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये काम केले.
+ सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये दिनांक 26/11/2016 ला पुन्हा डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये उप-कमांडर या पदावर आजपर्यंत काम केले.

 कार्यकाळात केलेले गुन्हे

चकमक – 7

+ सन 2009 मध्ये मौजा पुंगड (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन 2009 मध्ये मौजा बालेवाडा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन 2009 मध्ये मौजा बाशिंग (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग.
+ सन 2010 मध्ये मौजा गरपा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन 2011 मध्ये मौजा कोल्हार (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग.
+ माहे मे 2020 मध्ये मौजा पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार शहिद झाले होते.
+ सन 2023 मध्ये मौजा मौजा हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.

खुन – 1

सन 2010 मध्ये मौजा कोंगाल जि. नारायणपूर (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

महाराष्ट्र शासनाने चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा याच्या अटकेवर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 71 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा, मा. अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.