महागाई च्या काळात युवकांकडून भजन -प्रबोधन स्पर्धाचे आयोजन अभिमानास्पद उपक्रम ---डॉ. नामदेव किरसाण
गडचिरोली : दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 रोजी मालेवाडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित खुले खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे हस्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किर सान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
राष्ट्रसंताचे भजन आणि विचार हे क्रांतिकारी होते, त्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले, आज देशात परत हुकूमशाही प्रस्तापित होत असताना त्या हुकूमशाही ला उकडून फेकण्यासाठी व परत लोकशाही निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंताच्या विचाराची गरज आहे असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
तर भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड महागाई वाढली असताना युवकांकडून भजन स्पर्धेचे आयोजन आणि त्यातून समाज प्रबोधन होणे हे अभिमानस्पद आहे असे मत डॉ. नामदेव किरसान यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरजी तुलावी, माजी सरपंच वासंतीबाई सयाम, सुधाकरजी भरणे, जीवनजी बांगरे, श्रावणजी दाणे, यशवंतजी मेश्राम, सुरेखाताई बनसकर, उमेशजी नंदनवार, वसंतजी घरते, सुभाषजी गुंडरे, राधेश्यामजी सिडाम तसेच साईबाबा नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, भजन मंडळ व गावकरी उपस्थित होते