देसाईगंज- समाज,गाव एक सामाजिक संरचना असुन या माध्यमातून राबविण्यात येत असलेली लोकाभिमुख उपक्रम मानवी जीवनात दिशादर्शक ठरत असतात.हे दिशादर्शक ठरणारे उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नव्हे समाजाला पर्यायाने गावाला दिशा देण्यासाठी शिक्षणाची विज्ञानवादी जोड दिल्यास अधिक प्रभावी ठरू शकतात.यास्तव अधिकाधिक उच्च शिक्षण घेणे तेवढेच गरजेचे आहे कारण शैक्षणिक क्षेञातुनच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे धडे मिळत असल्याने शिक्षण हे प्रभावी हत्यार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
ते देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील नवचैतन्य ग्रामीण दुर्गा उत्सव मंडळ गांधी पुतळा चौक झुरे मोहल्ल्याच्या वतिने गरबा स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विजय उके हे होते तर उद्घाटन माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डाॅ.नामदेव किरसान,रामदास मसराम, वामन सावसाकडे,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,मनोहर निमजे,नितीन राऊत,अविनाश गेडाम,प्रशाला गेडाम,रेखा मडावी,मनोज ढोरे,अरुण कुंभलवार,विजय कुंभलवार,संतोष पञे,गजानन सेलोटे,संदिप वाघाडे,पो.पा. मंगेश मडावी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हाॅयस्कूल कुरुडचे मुख्याध्यापक शकिल शेख यांनी मुस्लिम समाजाचे असताना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवून येथील जिल्हा परिषद शाळेचा अवघ्या चार महिण्याच्या कालावधित कायापालट करून गावाला राज्याच्या पटलावर ठसा उमटवण्यात मौलिक भुमिका बजावल्याने मंडळाच्या वतिने त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आला. सत्काराला उत्तर देताना शकिल शेख म्हणाले की जिल्हा परिषदेच्या शाळेतुनच घडलेल्या विद्यार्थ्यांनी देशाला नवी दिशा देण्यात मौलिक भुमिका बजावली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी गोरगरीब,शेतकरी,
शेतमजूरांच्या मुलांना योग्य दिशा आणि संस्कार मिळाल्यास या शाळा देखील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवू शकतात हे आपल्या कारकिर्दीत वारंवार सिद्ध झाले आहे.मात्र यासाठी सर्व सामान्य गोरगरीब मुलाच्या पालकांनी देखील तेवढेच आग्रही राहुन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून गावात शैक्षणिक स्पर्धात्मक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मनोज ढोरे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांच्या स्थानिक आमदार निधीतून १५ लाखाचा ग्रंथालय मिळवून घेतला असून पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांच्या स्थानिक आमदार निधीतून आवश्यक पुस्तकाच्या संग्राहलयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ब्राम्हणवाडे यांनी यावेळी उपस्थितांना दिले. आयोजित गरबा स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श गरबा ग्रुप कुरुड,द्वितीय पुरस्कार जय माता दि गरबा ग्रुप आरमोरी, तृतीय पुरस्कार जय मल्हार गरबा ग्रुप जुनी वडसा,चतुर्थ पुरस्कार झेड.एम.के.गरबा ग्रुप कुरूड,पंचम पुरस्कार स्त्री शक्ती गरबा ग्रुप इटखेडा यांना देऊन विजेत्या गृपना पुरस्कार निधी राशीने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रल्हाद देवतळे,प्रास्ताविक प्रशांत देवतळे तर आभार अमर भर्रे यांनी मानले.कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.