ब्रम्हपुरी : तालुक्यातील चिखलगाव येथे वैनगंगा नदीचे पूर ओसरले पण आज सकाळच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात अवैध रेती उपसा होत आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे रेतीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जात असूनही महसूल विभाग दिसून न दिसल्यासारखे करीत असल्याने एवढे निद्रावस्थेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर प्रशासन आळा घालणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.
चिखलगाव परिसरात पूर ओसरला आणि हे खोदकाम करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचा वापर करून गावातील मुख्य रस्त्याने वडसा, ब्रम्हपुरी, सुरबोडी, जुनी वडसा ही अवैध रेती वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.
वैनगंगा नदी तालुक्यातील एकमेव मोठी नदी आहे. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला महापूर आलं होत. जुन्या रपत्याची दुरुस्ती आजही झाली नाही. जानेवारीपासून नदीचा प्रवाह थांबल्याने अनेक ठिकाणी पात्र उघडे आहे. ही ठिकाणे आता वाळू माफियांचे लक्ष्य आहेत.
अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.