देवरी:- देवरी शहरातील वंदना कन्या विद्यालय जवळ ट्रॅक्टर चालकाने लापरवाहीने ट्रॅक्टर चालवून दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार महिलेच्या अंगावरून ट्रॅक्टरचा चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. ही घटना ३० सप्टेंबरच्या सायंकाळी ६ वाजता सुमारासची आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील शेडेपार येथील बुधीहार रविंद्र मडावी ही महिला आपल्या जाऊ सोबत दुचाकीने जात होती. वंदना कन्या विद्यालय समोर ट्रॅक्टर चालकाने लापरवाही चालवून दुचाकीला धडक दिली. दरम्यान दुचाकीवर बसलेले फिर्यादी महिलेची जाऊ खाली पडली असता, तिच्या अंगावरून ट्रॅक्टरचा चाक केल्याने जखमी झाली. जखमी महिलेला तुर्त उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक गुड्डू पेरणे (३०) रा. देवरी च्या विरुद्ध देवरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.